औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना त्यांच्या गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की गांजाचा एक मोठा असाइन्मेंट औरंगाबादला येणार आहे. त्यांनी आपले विश्वासातील पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी राहुल रोडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांनी एक आणि दोन फेब्रुवारी च्या मध्यरात्री केंब्रिज शाळेजवळ सापळा रचला. रात्री 3:30 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एक ऑटो रिक्षा आणि एका विना नंबरच्या मोपेड वर स्वार तिघांना अडविले. त्यांचे ताब्यातून तब्बल 11 क्विंटल 70 किलो गांजा (किंमत अंदाजे 22,34,000/- रुपये) जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे बख्तियार खान रा. किराडपुरा, शेख शोएब राहणार रहमानिया कॉलोनी, आणि रिक्षाचालक शेख शाहरुख राहणार टाउन हॉल अशी आहेत.

पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांना सदर कारवाईत पोलीस नाईक सय्यद शकील, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान पठाण, ए आर खरात, मनोज विखनकर, विजय निकम, व्ही जे आढे, व्ही एस पवार, फोटोग्राफर पोलीस नाईक चौधरी यांनी सहकार्य केले. यासंदर्भात एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशन मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.