औरंगाबाद : कोविड-19 विषाणु प्रतिबंधात्मक लस पूर्णत: सुरक्षित असून कोरोना आजारापासून स्वत:बरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वत: लस टोचून घेतल्यानंतर केले.
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, दीपक गिह्रे, उपायुक्त परिमंडळ 2 यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे नोंदणी करुन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, इतर आरोग्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.