औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यात आज 51 जणांना (मनपा 42, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44983 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 38 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46497 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1226 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (28)
अजंता, कॅनॉट गार्डन(1), गजानन मंदिर (1), सिंधी कॉलनी (1), बन्सीलाल नगर (2), भवानी चौक (1), बजाज नगर (1), घाटी परिसर (2), एन सात, सिडको (1), गारखेडा परिसर (1), साई नगर (1)अन्य (16)

ग्रामीण (10)
अंजनडोह (01), अन्य (09)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत जातेगावातील 65 वर्षीय पुरुष, बजरंग चौक, सिडकोतील 78 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.