औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 71 जणांना (मनपा 50, ग्रामीण 21) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46721 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 281 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49291 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1258 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1312 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (262)
एन-3 सिडको (6), बीडबाय पास (5),गुलमंडी (1), एन-9 (1), एन-5 (1), एन-7 (3), चंद्रनगर सिडको (1), श्रीकृष्ण नगर (1),हर्सूल (3), रामनगर (2),नारेगाव (1), नारळीबाग (2), सावरकर चौक (1), गारखेडा (3),हनुमान नगर (1), लक्ष्मीनगर (1), रामाकल्चरल हॉल (1), नंदनवन कॉलनी (5), एन- 6 (1), हडको (3),कासलीवाल विश्व (1), कैलास नगर (1),पुंडलिकनगर (2), ज्योती नगर (5), श्रेय नगर (1), शिवाजी नगर (2), जयभवानी नगर (1),एन-2 (3), वेदांत नगर (1), एन-1 सिडको (2), दशमेश नगर (1),देवळाई रोड परिसर (3), मुकुंदवाडी (1),एन -4 (2), गादीया विहार (2), पडेगाव (3), चिकलठाणा (1), एन -8 (1), शिवकॉलनी (3), चेतक घोडा परिसर (1),राधास्वामी कॉलनी (1),घाटी परिसर (2),जाधववाडी (2) सुराणा नगर (1), प्रतापनगर (2),संजयनगर (1),वसुंधरा कॉलनी (1), पदमपुरा (2), वेदांतनगर (2), सातारा परिसर (1),पिसादेवी (1),एसबी कॉलनी (1), निराला बाजार (3),खिवंसरा पार्क (1), समर्थ नगर राजतारा हौ. सो (2), सिंधी कॉलनी (2), सुयोग हा. सो. (1), शक्ती नगर, सीबीएस रोड (3), इसीआय मोबिलिटी प्रा. लि. (2), अन्य (151)

ग्रामीण (19)
बजाजनगर (5), राजतारा हौ. सो (2), अन्य (12)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत खुलताबाद तालुक्यातील सुलतानपुरा येथील 47 वर्षीय पुरूष, शहरातील कलेक्टर ऑफिस कंपाऊंड परिसरातील 74 वर्षीय पुरूष आणि देवगाव रंगारी, कन्नड येथील 80 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.