औरंगाबाद । घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की, भाऊसाहेब चंद्रकांत काळे वय 40 वर्ष, धंदा ठेकेदारी, राहणार वाडी नांदर, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, हल्ली मुक्काम सावतामाळी मंदिराच्या जवळ, रांजणगाव, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद यांचे मोटरसायकलचे पेट्रोल दिनांक 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता चे सुमारास संपल्याने ते रांजणगाव फाट्यावर उभे असतांना तीन अनोळखी मुले तिथे आली. त्यांच्यापैकी दोघांनी त्याला बळजबरीने त्यांच्याजवळील सीबीझेड मोटर सायकलवर बसविले व एक जण त्यांच्या मोटर सायकल जवळ थांबला. दोघांनी त्यांचे मोटरसायकलवर अपहरण केले. आणि मोटर सायकलवर आंबेडकर चौक, प्रताप चौक, मोरे चौक मार्गे ए एस क्लब समोरील उड्डाण पुलाच्या पुढे नेऊन खाली उतरवले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यांना तिथेच सोडून ते दोघेलुटारु मोटरसायकलने तिथून पळून गेले.

फिर्यादीने रांजणगाव फाट्यावर जाऊन पाहिले असता त्यांची सुपर स्प्लेंडर मोटर सायकल तिथे दिसली नाही. तिथे थांबलेल्या लुटारूंनी ती मोटर सायकल चोरून नेल्याचे समजले.

रांजणगाव फाट्यावर तीन लुटारूंनी त्यांचे अपहरण केले, त्यांचे कडील मोबाईल व पैसे हिसकावून घेतले, स्प्लेंडर मोटर सायकल चोरून नेली. लुटारूंनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. एवढा गंभीर प्रकार घडल्यानंतर सुद्धा या महाशयांनी या घटनेची तक्रार तब्बल बारा दिवसानंतर म्हणजेच 31 डिसेंबर रोजी दुपारी 01:41 वाजता पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज येथे दिली.

या महाशयांनी दिलेल्या रिपोर्ट प्रमाणे पोलीस स्टेशन एमायडीसीवाळूज येथे अपराध क्रमांक 722/2020 कलम 363, 394, 34 भारतीय दंड विधान अन्वये नोंदविण्यात आला. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ओगले करीत असतानाच या गुन्ह्याची माहिती औरंगाबाद शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जारवाल आणि त्यांच्या टीम मिळाल्याबरोबर त्यांनी समांतर तपासाला सुरुवात केली. त्यांना लगेच त्यांचे गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की घटनेच्या बारा दिवसानंतर अपहरण आणि लुटमार झाल्याची तक्रार देणाऱ्या महाशयांचे विरुद्ध चा हा गुन्हा बोजगाव, तालुका सिल्लोड येथील भाऊसाहेब तुळशीराम जंजाळ आणि परभणी येथील गणेश प्रकाश मुंजवर या दोघांनी त्यांचे एका साथीदारासह केला असून गुन्ह्यात चोरलेली मोटर सायकल भाऊसाहेब जवंजाळ याने त्याचे मूळ गावी सिल्लोड तालुक्यातील बोजगाव येथे नेलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जारवाल यांनी सायंकाळी सहा वाजताच त्यांच्या टीमसह तात्काळ बोजगाव गाठले. भाऊसाहेब जवंजाळ तर त्यांना सापडला नाही परंतु चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक एम एच 20 एफसी 5918 त्याचे घरासमोर मिळून आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जारवाल यांनी ही मोटर सायकल जप्त केली आणि पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूजचे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.

तीन अनोळखी लुटारूंनी फिर्यादीचे अपहरण करून त्याला मारहाण करून त्याची मोटर सायकल, पैसे आणि मोबाईल हिसकावून गेल्याची तक्रार घटनेच्या बारा दिवसानंतर करून सुद्धा औरंगाबाद शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जारवाल यांच्या गुप्त बातमीदारांच्या नेटवर्क मुळे आणि त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अवघ्या चार तासातच लुटारूंनी चोरलेली मोटर सायकल हस्तगत करता आली. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जारवाल आणि त्यांच्या टीम चे कौतुक केले जात आहे.

अपहरण करून लूटमार आणि मारहाण झालेल्या फिर्यादीने तब्बल बारा दिवसानंतर एवढ्या उशिराने पोलीस स्टेशन एमायडीसीवाळूज येथे तक्रार देण्याचे काय कारण होते? ते सध्या तरी गुलदस्त्यात आहे.