औरंगाबाद | इंग्लंडच्या कोरोना संदर्भ देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात रात्रीचा कर्फ्यू लागू केला असतानाच इंग्लंड मधील कोरोनाविषाणू आता औरंगाबादेत दाखल झाल्याची बातमी औरंगाबादेत पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इंग्लंडमधून एक 57 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून तिला ते का खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिचे स्वॅबचे नमुने पुण्यातील एन आय व्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून तपासणी अहवाल आल्यानंतर तो करोना कोणत्या स्वरूपाचा आहे ते स्पष्ट होईल.

विदेशातून औरंगाबादेत आलेल्या 36 पैकी आतापर्यंत अकरा जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी नऊ निगेटिव निघालेत, एकाचा अहवाल पॉझिटिव्ह असून ती 57 वर्षीय महिला आहे. ती दहा दिवसापूर्वी लंडनहून औरंगाबादेत आली होती. तिची रिपीट RTPCR चाचणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव निघाली. तिला धूत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिला आणि तिचा पती असे दोघेच औरंगाबादेत राहतात पतीचाही स्वॅब घेण्यात आला आहे.