सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक सन 2020-21 अनुषंगाने दि. 18/01/2021 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर आपण निवडणूक संदर्भाने लागू असलेल्या आचार संहितेचे पालन करणे बंधनकारक आहे,
✓मा.पोलिस आयुक्त, व मा. जिल्हाधिकारी साहेब, औरंगाबाद यांचे जमाव बंदी व शस्त्र बंदी आदेश लागू असून आपण किंवा आपल्या अनुयायी/कार्यकर्ते एकत्र येऊन घोषणाबाजी करणार नाही.
✓एकत्र येऊन जमाव जमवून कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करणार नाही.
✓कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक व जातीय भावना दुखावतील असे कृत्य व भाष्य करू नये.
✓कोरोना आजाराचे प्रादुर्भावामुळे एकत्र येण्यास व मिरवणूक काढण्यास मनाई आहे.
✓पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
✓विजय/पराभव झाल्यास तो शांततेच्या मार्गाने स्वीकारून आपणाकडून अथवा आपल्या समर्थकांकडून सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
✓फटाके वाजवू नये तसेच गुलाल उधळवू नये.
✓कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त बॅनर किंवा होर्डिंग्ज लावू नयेत.
✓कोणत्याही प्रकारच्या विजयी सभा किंवा मिरवणुका आयोजित करू नयेत.
✓सोशल मीडियाचा वापर करून कोणतेही आक्षेपार्ह विधान किंवा संदेश प्रसारित करू नये.
✓ कोणतेही जेवण, भंडारे किंवा आनंद जल्लोषाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत.