औरंगाबाद । महावीर भवन येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आली आहेत.

मिशन 60 +  हाती घेण्यात आले असून सर्वच्या सर्व जागा लढणार असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगत कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या बैठकीनंतर संघटनमंत्री विजयराव पुराणिक, गिरीश महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची अन्य एक बैठक झाली.

प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री गिरीष महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे व प्रमुख नेते उपस्थित होते.