औरंगाबाद । बीड बायपास रोडवर मागील आठवड्यात चार जण बळी पडले. या अपघातांच्या पार्श्वभुमीवर औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बीड बायपास रस्त्याची पाहणी केली. त्यात महानुभव चौक, पैठण रोड, एमआयटी कॉलेज चौक, रेणुका माता मंदिर कमान, देवळाई चौक, बाळापुर फाटा या ठिकाणी पाहणी केली. बीड बायपास रोडवरील वाहतूक कशी सुरळीत करता येईल? त्यावर काय तोडगा काढता येईल? याचा आढावा घेण्यात आला. या वेळी उपायुक्त मिना मकवाना, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच इंजिनिअर प्रशांत अवसरमल, राष्ट्रवादी सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष विलास मगरे, कंत्राटदार उपस्थित होते.