औरंगाबाद : सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रांतील सुमारे चार दशकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ पत्रकार गजानन बोदडे यांना “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार” देऊन निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने गौरविण्यात आले आहे.
नामविस्तारदिनाचे औचित्य साधून आयोजीत समारंभात आंबेडकरी घराण्याचे सुपुत्र तथा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक त्यांना पुरस्काराचे मानपत्र देण्यात आले. यावेळी आंबेडकरवादाचे भाष्यकार, प्रख्यात साहित्यिक विचारवंत डॉ ऋषिकेश कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विचारवंतडॉ.आर.के. क्षीरसागर, माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ विधीतज ऐडवोकेट बी.एच.गायकवाड़, सामाजिक कार्यकर्ते एन.डी.जीवने, इंजि. राजधर दांडगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा संपादक रतनकुमार साळवे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या संस्थेने या पुरस्काराचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ पत्रकार गजानन बोदडे यांचे हा मानाचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सर्वश्री पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे,
रुपराव खंडारे, रविंद्र वाकोडे, देविदास काकडे,
एकनाथ पाखरे, भीमराव गाडेकर, सुरेश चव्हाण,
तथागत बोदडे, निर्मिक बोदडे, नजीम काज़ी ,
नदीम सौदागर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.