धारणी । अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील धारणी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आज दुपारी एक वाजता आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात त्यांनी वडील आणि पत्नीची माफी मागितली आहे. याप्रकरणी धारणी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून आत्महत्येचे कारण सध्या तरी समजले नसून पोलीस तपासात ती उघड होईल.