औरंगाबाद । कोरौना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यू लादलेले आहे. औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याची पोलीस अधीक्षकांना संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आणि खेड्यापाड्यात थर्टी फर्स्ट च्या रात्री लोकांची गर्दी होऊन कोरूना चा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात थर्टीफर्स्टच्या रात्री म्हणजेच 31 डिसेंबर 2020 चे रात्री अकरा वाजेपासून 1 जानेवारी 2021 चे सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यू (संचार बंदी) लावलेले आहेत. त्याबाबतचे आदेश त्यांनी आज काढले आहे. संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांची विरुद्ध कलम 188 भारतीय दंड विधान अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा पण त्यात देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या या कर्फ्यू च्या आदेशामुळे ग्रामीण भागात जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या लोकांत निराशा पसरली आहे…