औरंगाबाद । अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस च्या D-1 कोच मधून राकेश कुशवाह हा अरुण वय 8 वर्ष व अभिषेक वय 5 वर्षदोन मुलासह ललीतपुर ते भोपाळ असा प्रवास करत होते
झाशी रेल्वे स्टेशनवर पाणी घेण्यासाठी राकेश खाली उतरला
पाणी बाटलीत पाणी भरण्यात मग्न होता तोच सचखंड एक्सप्रेस पुढील प्रवासास निघून गेली

राकेश चा डोक्यात गोंधळ उडाला त्याने ही माहिती RPF किंवा GRP ला न देता मुलांना शोधण्यासाठी झाशी हुन भोपाळ व तिथून इंदोर ला निघून गेला

आज सकाळी सचखंड एक्सप्रेस च्या D1 या कोच मधून झोपेतून उठून इतर कोच मध्ये वडील राकेश यांना ही भावंड शोधत होते

सचखंड एक्सप्रेस च्या डब्यात TTE प्रमोदकुमार यांनी संशय वरून दोन्ही भावंडे याची आस्तेवाईक चौकशी करून या घटनेची रेल्वे नियंत्रण कक्ष नांदेड व रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक औरंगाबाद यांना नागरसोल ते लासूर स्टेशन दरम्यान दिली

औरंगाबाद रेल्वे स्टेशन ला रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस चे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास उतरून घेतले
बरीच चौकशी करून देखील व्यवस्थित माहिती मिळाली नाही
या मुलांन विषयी ची माहिती रेल्वे पोलीस अधिकारी यांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना कळविले
रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी दोन्ही भावंडांना मध्यप्रदेश च्या हिंदी भाषा तुन संवाद साधला या वरून मिळालेली माहिती भारतीय रेल्वे प्रवासी सेना मध्यप्रदेश प्रमुख चंदू रावल यांना इंदोर ला दिली
अवघ्या 1 तासात ताच्या वडिलां शोधून व्हिडीओ कॉल वर मुला सोबत बोलणे करून दिले

राकेश कुशवाह हे आज रात्रीच्या ट्रॅव्हल्स बस ने इंदोर हुन औरंगाबाद ला आज सकाळी पोहचनार असून त्यांची व मुलांची भेट होणार आहे

दोन्ही भावंड यांना बाल सुधार गृह औरंगाबाद येथे ठेवण्यात आले आहे

या कामी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी , रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा , RPF ASI K चंदूलाल , RPF चे डोभाळ U R , महिला कर्मचारी गुड्डी कुमारी , दानिश कुमारी , व रेल्वे पोलीस अमर चौधरी यांनी सेवा कार्य केले