जालना (प्रतिनिधी) : जालना देऊळगाव राजा महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत कार पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झालेला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 08:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कार ही बीड कडून बुलढाण्या कडे जात होती. जामवाडी शिवारात एका वळणावर रस्त्याची कळीला असलेल्या एका विहिरीत पडली. या अपघातात एक जण जागीच मृत्यू पावला तर दुसऱ्या व्यक्तीला रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.

अपघात ग्रस्त कारचा नंबर MH 22AM 2701 असून मृत्यू पावलेल्या इसमांची नावे अब्दुल मन्नान शेख सगीर राहणार बीड, आणि अजहर कुरेशी कशी आहेत.

सदर प्रकरणात पोलीस पुढील तपास करीत आहेत.