जळगाव । भाजपचे नेते इतर पक्षांमध्ये जाऊ नयेत म्हणून, महा विकास आघाडीचे सरकार पडेल असे भाजपची नेते मंडळी म्हणत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण काळ करेल व यांना पुन्हा येईन, पुन्हा येईन असेच म्हणावे लागेल अशी बोचरी टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत, राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असून आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी गुरुवारी जळगाव येथील राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत खडसे बोलत होते.